You are currently viewing वसुंधरा

वसुंधरा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वसुंधरा*

 

हि वसुंधरा नटली

पहाच सभोवताली

खुलली अशी सृष्टीची

मनोहरी हरी लाली

 

शालू असा पांघरला

हिरवाईच्या रानात

सुगंध दरवळला

मंद धुंदीच्या वार्‍यात

 

वसुंधरा ही सजली

हिरव्यागार रानात

चांदवा हिरवळीचा

पडला नभांगणात

 

सळसळता आवाज

जणू रानाचे संगीत

न सोडवणारी अशी

सृष्टीची ही धुंद प्रीत

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा