*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वहीत जपलेलं पिंपळपान…!*
डोळ्याने पाहिली
होती पानाची कहाणी
ठेवली निशाणी
समर्पणाची…!
अंदाज घेतला
जेव्हा आतल्या पानाचा
निरखून पाहण्याचा
वहीत…!
दडले काळजातच
स्वप्न जे पाहिलेले
छान बांधलेले
घर…!
तेव्हा दिलेले
शब्द हाताने झेलले
नाही धजले
मन…!
जपून ठेवणे
त्याचे मला नडले
सारे घडले
विपरीत…!
रोज पाहते
वहीत जपलेलं पिंपळपान
जातेय विरून
जाळीत…!
जाळीदार पानाला
एकटक पाहत बसते
आठव आठवते
जुनेच…!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
