You are currently viewing उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन   

उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  

उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेजिल्हा क्रीडा परिषदसिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्यात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचेमुलांना वेळ घालविण्याकरीता काय घ्यायचेअसा विचार पालकांच्या मनात आला असेलच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावीखेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयसिंधुदुर्ग तर्फे कुस्ती या खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ही प्रशिक्षण शिबिर हे अनिवासी तसेच निशुल्क आहे. कुस्ती या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण दि. 23 एप्रिल ते 2 मे 2026 सकाळी 8 ते 10 या वेळेत न्यू इंग्लिश स्कूलफोंडाघाट. ता. कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ,  मो.क्र. ९८६७६९९२८१ यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा