You are currently viewing सिलिका माईन्स मुळे पियाळी नदीचे पाणी दूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सिलिका माईन्स मुळे पियाळी नदीचे पाणी दूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

१० गावांची नळपाणी योजना या नदीवर अवलंबून

जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

कणकवली

कणकवली तालुक्यातील नांदगाव, असलदे,कोळोशी, हडपीड,कासार्डे,वाघेरी, तोंडवली बावशी यासह १० गावात पियाळी नदीपात्रातून दरवर्षी सुरळीत पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलदे – पियाळी नदीपात्रात सिलिका माईन्सची वाळू धुतलेले पाणी सोडले जात आहे.यामुळे पियाळी नदीचे पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी लक्ष देतील का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

याबाबत नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच यांनी तहसीलदार कणकवली यांना लेखी पत्र दिले आहे. तरी देखील कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळे भविष्यात या पाण्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात येणार आहे याबाबत लवकरच प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नदीकाठी जाऊन गढूळ पाण्याची पाहणी केली. जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने या विरोधात संबंधितावर कारवाई करावी केळी नदीचे झालेले गढूळ पाणी कोणत्या कारणातून झाले त्याची चौकशी करावी अशी मागणी केली पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी भाई मोरजकर,संतोष पारकर,श्री.गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 7 =