You are currently viewing सौ. स्वाती शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

सौ. स्वाती शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

सौ. स्वाती शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील सेवाभारती संचलित माधव विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती शिंदे यांना आनंदगंगा फाऊंडेशन (मिणचे ) च्या वतीने शेक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

अतिग्रे येथे
एका शानदार समारंभात जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोक माने , सुप्रसिद्ध लेखक डॉ. चंद्रकांत पोतदार, उदयोगपती अमोल निकम, आनंदगंगा फाऊंडेशनचे संस्थापक तानाजी पवार यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

इचलकरंजी येथील माधव विदया मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती दादासो शिंदे या गेल्या ११
वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विदयार्थ्यांना दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्यातील
अंगभूत कला-गुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्या विविध माध्यमातून प्रयत्नशील असतात. याशिवाय विद्यालयामध्ये नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात
त्या अग्रेसर असतात, त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच आनंदगंगा फाऊंडेशनने त्यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड केली होती. नुकताच अतिग्रे येथे घोडावत विदयापीठाच्या प्रांगणात आयोजित शानदार समारंभात जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोक माने , सुप्रसिद्ध लेखक चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करून त्यांना
सन्मानित करण्यात आले. यावेळी माधव विद्या मंदिरच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुडे, सदस्य प्रकाश गणपुले , पंकज मेहता, उपमुख्याध्यापक किरण बन्ने यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + four =