मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये योग प्रशिक्षण वर्ग संपन्न
सावंतवाडी
सिं.जि.शि.प्र .मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत 15 एप्रिल ते 18 एप्रिल 2026 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी फिटनेस योगा अकॅडमी तर्फे योग शिबिर प्रशिक्षण वर्गाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या चार दिवसीय योग प्रशिक्षणात योगशिक्षक श्री.शेखर बांदेकर यांनी प्राणायाम ,सूर्यनमस्कार, वृक्षासन ,ताडासन ,शवासन ,अनुलोम- विलोम, आरोग्यदायी हास्य प्रकार, एरोबिक्स ,कवायती इत्यादी विविध आसने, कवायतींचा सराव घेतला तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींचे महत्त्व विषद करताना आहारासंदर्भात वर्तनासंदर्भात व अभ्यासाच्या योग्य पद्धतींबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आरोग्यदायी व अनुशासित विद्यार्थी घडविण्यात योगाभ्यासाची असणारी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. योग प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षणाच्या उपयुक्तते संदर्भात आपले विचार व्यक्त केले तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योग साधनेसाठी प्रेरित केले त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य श्री.जयप्रकाश सावंत यांनी योग साधने बद्दल अधिक जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांनी योगशैली आत्मसात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशालेतर्फे फिटनेस योगा अकॅडमीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेह भेटीने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अमिना नाईक व श्री. गणेश प्रभू सर यांनी केले.
या योग प्रशिक्षण वर्गाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.
