You are currently viewing अभिनव उद्योग प्रबोधिनी अंतर्गत उद्योजकता मार्गदर्शन मेळावा

अभिनव उद्योग प्रबोधिनी अंतर्गत उद्योजकता मार्गदर्शन मेळावा

कुडाळ :

 

उद्योग व्यवसायाबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी ने 8-9 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात विविध व्यवसाय संधी, त्यासाठीच्या शासकीय योजना, कर्जपुरवठा, लायसन्स, नोंदण्या, परवानग्या, प्रशिक्षण, मशिनरी, मार्केटिंग, विक्री, पॅकेजिंग, लेबलिंग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हे शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून ते 2 दिवस चालणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी, बँक अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी, सध्या सुरू असलेला व्यवसाय अधिक चांगल्या क्षमतेने चालण्यासाठी तसेच जोड धंदा किंवा इतर पर्याय शोधण्यासाठी या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्यांना या मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया Business हा कोड 8767473919 या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावा.

अधिक माहितीसाठी या 8767473919 नंबर वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा