You are currently viewing चौकेजवळ भीषण अपघात; युवक जागीच ठार

चौकेजवळ भीषण अपघात; युवक जागीच ठार

डंपर ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली

मालवण :

चौके-नांदरुख परिसरातील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०) यांचा मालवण-कसाल मार्गावर चौके धनगरांचा गोठा येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. चव्हाण हे आपल्या मेव्हण्यासोबत ॲक्टिवा (MH07 AD1633) या दुचाकीवरून घरी येत असताना डंपर (MH-07X 0666) ओव्हरटेक करताना अपघात घडला.

या अपघातात चव्हाण डंपरखाली गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर सोबत असलेल्या मेव्हण्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी चौके रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चौके परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत चंद्रकांत यांच्या पश्चात पत्नी, शिक्षण घेणाऱ्या दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच राजा गावडे, संतोष गावडे, बीजी गावडे, बंड्या गावडे, अजित गावडे, साई गावडे, सचिन आंबेरकर व अन्य ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा