You are currently viewing रात्री बाराच्या सुमारास कारीवडे येथे भीषण अपघात

रात्री बाराच्या सुमारास कारीवडे येथे भीषण अपघात

रात्री बाराच्या सुमारास कारीवडे येथे भीषण अपघात

संतोष गुळदवेकर युवक गंभीर जखमी सामाजिक बांधिलकीची मदत.

सावंतवाडी

काल रात्री बाराच्या सुमारास गोठण देवस्थान कारिवडे येथे संतोष गुळदवेकर 23 हे एका नाटक कंपनीमध्ये झांज वाजती आहेत रात्री नाटक संपल्यावर रात्री 12 च्या रुमारास माडखोल येथे आपल्या घरी मोटरसायकलीने जात असताना त्याला अचानक झोप आली व समोरून येणाऱ्या गाडीला त्याने जोरदार टक्कर दिली असता त्या अपघातात त्याच्या दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली तरी हात फॅक्चर झाला.
त्या प्रसंगी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी निलेश राऊळ त्यांचे सहकारी शरद पवार, व सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर यांनी तत्काळ त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व याची कल्पना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दिली असता रवी जाधव हॉस्पिटलमध्ये पोचले व त्याच्यावर प्रथमता प्राथमिक उपचार करून घेऊन लगेच नागरिकांचा शोध घेतला त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे पाठवण्यात आले.
आज सकाळी रवी जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकांची संपर्क साधला असता त्याची प्रकृती चांगली असल्याचे समजले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोस्कर व हॉस्पिटल कर्मचारी निलेश राऊळ यांचे मदत कार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा