You are currently viewing अधिवेशन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे

अधिवेशन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ , ठाणे शहर/ जिल्हा मार्फत १६ वे राज्य स्तरीय अधिवेशन २७ फेब्रुवारी २०२१ रोजी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न होणार होते.

परंतु राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले . मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशाचे पालन करून वसंत मुंडेअध्यक्ष, संजय भोकरेराज्य संघटक, विश्वासराव आरोटेसरचिटणीस, नवनाथ जाधवप्रसिद्धी प्रमुख, आणि कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १६ वे अधिवेशनला तूर्तास पुढे ढकलण्यात येत आहे

*मा. मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाला पुढील तारखेस नक्की येईन अशी ग्वाही दिली आहे की राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला मी उपस्थित राहीन.*

तरी अधिवेशन हे ठाण्यातच होणार असून अधिवेशनाची *पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल .*

प्रतिक्रिया व्यक्त करा