You are currently viewing अमृत महोत्सवी वर्षात नारायण राणे यांचा वाढदिवस दिमाखात होणार साजरा
Oplus_16908288

अमृत महोत्सवी वर्षात नारायण राणे यांचा वाढदिवस दिमाखात होणार साजरा

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचीही उपस्थिती निश्चित

कणकवली :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा १० एप्रिल रोजी होणारा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून, राज्यातील अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याने सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे.

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेत विविध मान्यवरांकडून त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा