You are currently viewing कासार्डे तिठा येथील ब्रिजला हायस्कूल समोर बॉक्सवेल पास होणे गरजेचा: ग्रामस्थ व पालकांच्या सह्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कासार्डे तिठा येथील ब्रिजला हायस्कूल समोर बॉक्सवेल पास होणे गरजेचा: ग्रामस्थ व पालकांच्या सह्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कासार्डे हायस्कूलचे व काॅलेजच्या विद्यार्थ्यांचा दररोज होतोय जीवघेणी प्रवास..

तळेरे

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाही या चौपदरीकणांमुळे अनेक ठिकाणी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कणकवली तालुक्यातील कासार्डेतिठा येथील कासार्डे हायस्कूल समोर बॉक्सवेल पास नसल्याने कासार्डे माध्यमिक ,उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर जीव धोक्यात घालून वाहनांचा अडथळा पार करीत प्रवास करावा लागत आहे.या ब्रिजला हायस्कूल समोर बॉक्सवेल पास तयार करून विद्यार्थ्यांची ग्रामस्थांची होणारी गैरसोय त्वरित दुर करावी अशी लेखी मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे यांनी सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
याबाबत दखल घेतली गेली नाही तर कासार्डे पंचक्रोशीतील जनतेला तीव्र आंदोलन करावे असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
कासार्डे तिठा येथे फोंडाघाट हुन येणारा हमरस्ता मिळतो. येथून‌ सुमारे ३०० मीटरवर कासार्डे तिठ्या पर्यंत नेहमीच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे ट्राॅफिक जाम होत आहे.वास्तविक ज्या ठिकाणी फोंडाघाटातून येणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला मिळतो त्याच ठिकाणी हायस्कूल समोर एक बाॅक्सवेल पास असणे गरजेचे होते. या ठिकाणी बॉक्सवेल पास व्हावा ही मागणी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थांकडून केली जात आहे मात्र महामार्ग प्राधिकरणाने याकडे कानाडोळा केल्याने बॉक्सवेल पास झालेला नाही. असा आरोप पालक व ग्रामस्थांमधून केला जात आहे.

कासार्डे माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षण दिले जात असल्याने याठिकाणी सुमारे १२०९पेक्षा अधिक विद्यार्थी नियमित ये-जा करीत आहेत. या विद्यार्थ्यांना नियमित प्रवास करताना या अरुंद रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
दररोज शाळा भरताना व सुटताना या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. या ब्रिजला ठेवलेला बाॅक्सवेल रस्ता मिळतो तेथून सुमारे तीनशे मीटर पुढे आहे तसेच हा रस्ता अरुंद सध्या प्रवासासाठी धोकादायक बनला आहे.

कासार्डेतील बहूतांश अस्थापणे ब्रीजच्या पश्चिमेला

कासार्डेच्या पश्चिमेला मोठी बाजारपेठ, दवाखाने, पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस, टेलीफोन ऑफिस, बँक, पशुवैद्यकीय दवाखाना, दुध डेअरी, पोलिस स्टेशन, सर्व गॅरेज, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था, ही आस्थापने आहेत. त्यासाठी कासार्डे, लोरे, पियाळी, वाघेरी, गडमठ या गावातील जनतेला याच अरुंद रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तसेच ब्रीजच्या पुर्वेला कासार्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ओझरम, दारुम तळेरे या गावातील जनतेला याच अरुंद रस्त्याने प्रवास करावा लागतो त्यामुळे हायवेला ज्याठिकाणी फोंडाघाट रस्ता मिळतो त्या ठिकाणी म्हणजेच कासार्डे हायस्कूल समोर गाड्यांसाठी व जनतेसाठी किमान 20 मीटर रुंदीचा बॉक्सवेल पास बनवणे आवश्यक आहे ,नाहीतर पुढील काळात याठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१२०० विद्यार्थ्यी करतात जीवघेणा प्रवास

कासार्डे माध्यमिक विद्यालयात सुमारे बाराशे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंत चे शिक्षण घेत आहेत त्यामुळे या ठिकाणी नेहमीच प्रचंड गर्दी असते त्यामुळे अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या ठिकाणी बॉक्सवेल तयार करण्याची मागणीही कासार्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालकांमधून केली जात आहे. तत्पूर्वी कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनीही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बॉक्सवेल तयार करुन गैरसोय दूर करण्याची लेखी मागणी याठिकाणी ब्रीज होण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करीत लक्ष वेधले होते, पण कोणत्याही प्रकारची याबाबत दखल घेतली गेली नाही त्यामुळे या ठिकाणी बॉक्स वेल पास झालेला नसल्याने सध्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.
यासंदर्भात कासार्डेचे सरपंच बाळाराम तानवडे, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय संभाजी पाताडे तसेच नव तरुण उत्कर्ष मंडळ कासार्डे चे अध्यक्ष सहदेव खाडये यांनी १५०० ग्रामस्थांच्या सह्याचे लेखी निवेदन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रत्नागिरीचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय खारेपाटणचे सहाय्यक अभियंता आणि या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण के.सी.सी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना ही यासंदर्भात निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

कासार्डे: मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेतीठा ब्रीजनजीक हायस्कूल समोर अरुंद रस्त्यामुळे व ट्राॅफिक जाम होत असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जीवन प्रवास करावा लागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =