व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30 कि. मि. क्षेत्रापैकी सुमारे 3 कि.मी.मध्ये 135 मिटरचा चढ आहे. येथे अवजड वाहने चढणे शक्य नसल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे यासाठी अलायमेंट बदल करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. अलायमेंट बदल करावयाचे असलेले 3 कि.मी. अंतर सोडून उर्वरीत 4.30 कि.मी. साठीचे टेंडर तातडीने काढा, दरम्यानच्या कालावधीत त्या अलायमेंट बदला बाबतची कार्यवाहि पुर्ण करा,अशा सूचना बैठकीत खासदार विनायक राऊत व आपण केल्या. त्यानुसार तातडीने कार्यवाहि करण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर,बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार, रत्नागिरी विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, वन विभागाचे श्री. बेन, मोनार्ज कंपनीचे श्री. प्रसाद व इतर अधिकारी सहभागी झाले होते.
घोटगे सोनवडे घाटमार्गाच्या कोल्हापूर विभागाकडील रस्त्याच्या कामापैकी सुमारे 800 मिटर घाटाचे काम शिल्लक आहे. तेथे काम पुर्ण करण्यास अडचण नाही. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हय़ातील घाटमार्ग जोडण्याचे 7.30 कि.मी.चे काम शिल्लक आहे. यात सुमारे 3 कि.मी.च्या रस्त्याला 135 मिटरचा थेट चढ असल्याने येथे अवजड वाहने जाणे कठीण होईल. यासाठी अलायमेंटमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता पुन्हा सर्व प्रक्रिया करण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याकडे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. यासाठी ज्या भागाचे म्हणजे 3 कि.मी. क्षेत्राचे अलायमेंट बदलणे आवश्यक आहे. तो भाग वगळत उर्वरीत 4.30 कि.मी.साठीचे टेंडर तातडीने काढा. तसेच गतवर्षीच्या बजेटमध्ये तरतूद असली तरीहि हे काम आता नविन वर्षात होणार असल्याने त्यासाठी बजेट तरतुदीत ते समविष्ट करा, अशा सूचना केल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. त्यानुसार चढ कमी करण्याच्या अनुषंगाने अलायमेंटमध्ये काहि प्रमाणात बदल करून आवश्यक कार्यवाहि तातडीने करण्याच्या अनुषंगाने कार्यवाहि करून पुढील आठ ते दहा दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.