You are currently viewing जिल्ह्यात असणार्‍या परप्रांतीय कामगारांची नोंद प्रक्रिया सुरू; पोलिस अधिक्षकांचे आदेश – अमित इब्रामपूरकर

जिल्ह्यात असणार्‍या परप्रांतीय कामगारांची नोंद प्रक्रिया सुरू; पोलिस अधिक्षकांचे आदेश – अमित इब्रामपूरकर

‘मनसे’ ने मानले ‘एसपीं’ चे आभार

मालवण

जिल्ह्यात असणार्‍या परप्रांतीय कामगारांची नोंद करण्याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व पोलिस ठाण्यांना आदेश दिले असुन मालवण पोलिस ठाण्यात परप्रांतीय कामगारांची नोंद बुधवार पासुन सुरू झाल्याची माहिती मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.जिल्हा पोलिस अधिक्षकांचा निर्णय योग्य असुन याबाबत मनसेतर्फे त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानत या निर्णयामुळे गुन्ह्यांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल हे भविष्यात दिसेल असे म्हटले आहे.

यासंदर्भातील अधिक वृत्त असे की, विविध कामांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतिय कामगारांमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला धोका पोहचत असल्याने जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला परप्रांतीय कामगारांची नोंद करावी अशी मागणी मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली होती.

आंतरराज्य स्थलांतरित कायदा १९७९ ची अंमलबजावणी करा.आजही जिल्ह्यात परप्रांतीय मजूर, इमारत बांधकाम वाळू व्यवसाय, समुद्रात मच्छीमारी व्यवसायासाठी खलाशी म्हणून हजारोंच्या संख्येने येत आहेत.या कामगारांची नोंद होताना दिसत नाही.भविष्यात या परप्रांतीयांकडून दरोडे, घरफोडया, बलात्कार, जीवघेणे हल्ले होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करत प्रत्येक पोलिस ठाण्यात फोटो ओळखपत्रासहित नोंद आवश्यक असल्याचे म्हटले होते.

त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना परप्रांतीय कामगारांची नोंद करण्याचे आदेश दिले असुन मालवण पोलिस ठाण्यात परप्रांतीय कामगारांची नोंद बुधवार पासुन सुरू झाल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा