You are currently viewing रविवारी श्रीकांत चौगुले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

रविवारी श्रीकांत चौगुले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

*रविवारी श्रीकांत चौगुले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन*

पिंपरी (दिनांक : ०१ एप्रिल २०२६)

शिक्षण क्षेत्रात अडतीस वर्षे कार्यरत असणारे व गेली पंचवीस वर्षे राज्यस्तरावर शैक्षणिक योगदान देणारे श्रीकांत चौगुले यांच्या शैक्षणिक अनुभवावरील ‘शिक्षणाच्या वाटेवर’ या पुस्तकाचे प्रकाशन, इतिहास संशोधक व मराठी विश्वकोशाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी, पद्मश्री गिरीश प्रभुणे, आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त सु .वा. जोशी आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. श्रीकांत चौगुले यांनी बालभारती, बालचित्रवाणी, एससीईआरटी, जीवन शिक्षण यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर काम केले आहे. त्यांची शिक्षण विषयक अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी चिंचवड येथील समरसता गुरुकुलम् येथे संपन्न होणार आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा