You are currently viewing मुणगे ग्रामपंचायत आणि एकता ग्राम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवती हायस्कूल येथे महिला दिन साजरा

मुणगे ग्रामपंचायत आणि एकता ग्राम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवती हायस्कूल येथे महिला दिन साजरा

मुणगे ग्रामपंचायत आणि एकता ग्राम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवती हायस्कूल येथे महिला दिन आज साजरा करण्यात आला.

याकरिता मुंबईस्थित आड बंदर चे सुपुत्र श्री आनंद मालाडकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

यावेळी गावातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षिका, ग्रामसेविका, तलाठी मॅडम, महिला पोलीस पाटील, कृषी सहाय्यका आरोग्य सेविका, आरोग्य समुदाय सेविका, आशा सेविका, अंशकालीन परिचारिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्राम संघाच्या अध्यक्ष, सचिव ,कोषाध्यक्ष, सी आर पी, महिला होमगार्ड महिला, पोस्ट मास्तर, सहकारी सोसायटीच्या सचिव, महिला पत्रकार अशा विविध पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. महिला सरपंचापासून गावातील प्रत्येक प्रमुख पदावर महिला पदाधिकारी असणारे कदाचित मुणगे हे एकमेव गाव असावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा