You are currently viewing “चला,बकुळीच्या फुलांचा सुगंध घेऊया” – अँड.नकुल पार्सॅकर

“चला,बकुळीच्या फुलांचा सुगंध घेऊया” – अँड.नकुल पार्सॅकर

 

आमचे परममित्र, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष, कवी श्री दीपक पटेकर ऊर्फ दिपी यांच्या “बकुळीची फुले” या काव्य संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता सुंदरवाडीच्या मोती तलावाच्या केशवसुत कट्यावर श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे इंग्लिश विषयाचे माजी प्राध्यापक तथा आजरा काॅलेजचे माजी प्राचार्य, जेष्ठ साहित्यिक डॉ.एच्. व्ही. देशपांडे सर, ज्येष्ठ मालवणी कवी श्री.विनय सौदागर, पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि जेष्ठ साहित्यिक डॉ.जी.ए.बुवा तसेच जेष्ठ लेखिका सौ.उषा परब, कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

खरे तर दीपक पटेकर हे बांधकाम व्यावसायिक, माञ एखादा व्यावसायिक हा साहित्यिक चळवळीत मनापासून तळमळीने काम करतो, लेखन करतो हा अपवाद असून त्यांचे खरोखरच कौतुक आहे. यापूर्वी त्यानी अनेक रचना केलेल्या असून महाराष्ट्रातील विविध साहित्यिक संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. दोन महिन्यांपूर्वी सातारा येथे संपन्न झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी त्याना निमंत्रित करण्यात आले होते.

हल्ली साहित्याचा गंध नसलेली मंडळी साहित्यिक म्हणून मिरवत असतात पण, दीपक पटेकर यांची स्वतःची प्रतिभा आहे जी दिवसेंदिवस बहरते आहे, फुलते आहे. बकुळीची फुले हा त्यांचा कवितासंग्रह म्हणजे मानवी भावभावनांचा एक सहज उलगडणारा अविष्कार आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून कवी दिपी यांच्या बकुळीच्या फुलांचा सुगंध घेऊया.

प्रतिक्रिया व्यक्त करा