You are currently viewing कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना व वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन; नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
Oplus_16908288

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना व वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन; नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली :

कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना (एस्कलेटर) कामाचे भूमिपूजन तसेच वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आमदार ॲड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, अधिकारी शैलेन्द्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर तसेच आरपीएफचे कोकण विभागीय आयुक्त यश मिश्रा, अधिकारी गोकुळ सोनोल उपस्थित होते.

कणकवली रेल्वे स्थानकाचे आरपीएफ पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, संध्या तेरसे यांच्यासह कोकण रेल्वे कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा