You are currently viewing मोदी सरकार सत्पवर्षपुर्ती झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपाच्या वतीने वेंगुर्ले शहरातील गवळयांना ताडपत्रीचे वाटप..

मोदी सरकार सत्पवर्षपुर्ती झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपाच्या वतीने वेंगुर्ले शहरातील गवळयांना ताडपत्रीचे वाटप..

वेंगुर्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ३० मे रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला सात वर्षे पुर्ण करीत आहेत. त्या निमीत्ताने भाजपा च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विवीध सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
वेंगुर्ले तालुक्यामध्ये विविध सेवा कार्य हाती घेऊन सत्पवर्षपुर्ती उत्साहात साजरी करण्यात आली. या सेवा सप्ताहाचा शुभारंभ आगळा वेगळा उपक्रम हाती घेऊन करण्यात आला. समाजातील एक घटक गवळी. हा गवळी काबाडकष्ट करून गुरांचे पालन – पोषण करीत असतो .

गुरांसाठी लागणारे वैरण हे गोठ्याच्या बाजुला एका मांगरात किंवा बाहेर माच करुन ठेवलेले असते .परंतु पावसामध्ये गुरांसाठी ठेवलेले वैरण भीजुन खराब होते व ओले झालेले वैरण गुरेही खात नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक भावनेतून गवळयांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले .
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील कॅम्प – गवळी वाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप व प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, अल्पसंख्याक आघाडीचे रफिक शेख, युवा मोर्चाचे संदीप पाटील, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण, महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, राधा सावंत, शैलेश मयेकर, पुंडलिक हळदणकर, रामदास मंबाईल, अशोक जगताप, गजानन जगताप इत्यादी उपस्थित होते.

यावेळी गवळी समाजाचे दिगंबर जगताप, पिंटू जगताप, प्रसाद बावीसकर, दिनेश गवळी, कांता भैरट, मैनु धारवाडकर, संतोष गावडे, पांडुरंग मराठे तसेच हाॅटेल व्यवसायिक विजु खानोलकर, राजश्री खानोलकर यांना ताडपत्री देण्यात आल्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 17 =