You are currently viewing वेंगुर्ले येथे राहुल गांधी वाढदिनी मोदींच्या विरोधात घोषणा…

वेंगुर्ले येथे राहुल गांधी वाढदिनी मोदींच्या विरोधात घोषणा…

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे आदरणीय नेते व देशाचे भावी पंतप्रधान खासदार राहुलजी गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी राहुलजी को लाना देशको बचाना है! राहुलजी को लाना किसानको बचना है! राहुलजी को लाना है बेरोजगारी हटाना है! राहुलजी को लाना है मंहगाई घटाना है!  नरेंद्र मोदी किसान विरोधी.. अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.

यावेळी केंद्र सरकारने केलेल्या शेतक-याना देशोधडीला लावणा-या तिनही कृषी कायद्याची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, तालुका अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष नगरसेवक व गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक आत्माराम उर्फ दादा सोकटे, नगरसेविका स्नेहल खोबरेकर, एन.एस. यु.आय.तालुका अध्यक्ष शुभम गावडे अंकुश मलबारी, समीर नागवेकर, सागर नांदोसकर, देवेंद्र सातोसकर, अक्षय डोंगरे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा