आनंद शिरवलकर यांची भाजपच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती….

आनंद शिरवलकर यांची भाजपच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती….

सावंतवाडी
भाजपचे कुडाळ येथील युवा पदाधिकारी आनंद शिरवलकर यांची भाजपच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी त्यांना सुपूर्द केले.

यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सभापती मानसी धुरी, नगरपालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर अन्य नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आपला अनुभव आणि पक्षासाठी असलेले योगदान पक्षाच्या संघटन वाढीसाठी भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशा शब्दात यावेळी भाजप सचिव निलेश राणे यांनी आनंद शिरवलकर यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा