सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत हळद खरेदी केंद्र व हळदपुड तयार करणा-या मशिनचा शुभारंभ….

सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत हळद खरेदी केंद्र व हळदपुड तयार करणा-या मशिनचा शुभारंभ….

माणगाव हेडगेवार प्रकल्प येथे आमदार नितेशे राणे व सौ. सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन..

सिंधुदुर्गातील शेतक-याला हळद लागवडीतून आत्मनिर्भर बनवणार–अतुल काळसेकर

कुडाळ
माणगाव डाॅ. हेडगेवार प्रकल्प, येथे सिंधु आत्मनिर्भर अभियान सिंधुदुर्ग व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुभारंभ करण्यात आला. आत्मनिर्भर अभियान संयोजन अतुल काळसेकर, हेडगेवार प्रकल्प, भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या संकल्पनेतून योजना राबविण्यात आली आहे. चालू वर्षे 25 हजार किलो हळदीच्या बियाणांंचे वाटप करून पिकवलेल्या हळदीची खरेदी आज पासून माणगाव हेडगेवार प्रकल्प येथे सुरू केली असून या हळदीची पुड तयार करून मार्केट मध्ये पाठवण्याची व्यवस्था ही हेडगेवार प्रकल्प यांच्या माध्यमातून सुरू झाली.

ओरोस येथील महिला बचत गटाने तयार केलेल्या हळदीची खरेदी आमदार नितेश राणे व सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण व सुनील उकीडवे यांच्या हस्ते झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 75 ते 100 टन हळदपुड होणार तयार होणार असून प्रतीटन सुमारे 10,000 रूपये येवढा  विक्रमी हमीभाव मिळणार आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, सौ सुहासिनी रविंद्र चव्हाण, डाॅ प्रसाद देवधर, श्री उकीडवे सर सौ नुतन आईर, विनायक राणे, अतुल काळसेकर, राजू राऊळ, भाई सावंत, प्रभाकर सावंत दिपक नारकर, रूपेश कानडे, जोसेप डाॅन्टस, संध्या तेर्से, सौ मोहीनी मडगावकर, स्वप्ना वारंग प. च. सदस्या, मोहन सावंत, दिपक नारकर, भाई बेळणेकर, बंड्या सावंत, चारूदंत्त देसाई, दादा साईल, सचिन धुरी, राजा धुरी,श्रावण धुरी, दिनेश शिंदे , पांडुरंग कोंडसकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा