You are currently viewing विना माक्स फिरणाऱ्यांवर २०० लोकांवर तीन दिवसात दंडात्मक कारवाई, मात्र आठवडा बाजार चालू….

विना माक्स फिरणाऱ्यांवर २०० लोकांवर तीन दिवसात दंडात्मक कारवाई, मात्र आठवडा बाजार चालू….

कणकवली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक अंबलबजावणी करायचा आदेश दिल्या नंतर कणकवली शहरात विना माक्स फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून गेल्या तीन दिवसात विना माक्स फिरणाऱ्या २०० नागरिकांवर शहरात न.पं.तर्फे करवाईं करण्यात आली. त्यांच्या कडून प्रत्येकी २०० रुपये दंड आकारून एकूण दंड तीन दिवसात ३४६०० रुपये जमा करण्यात आला. मात्र आठवडा बाजारही बंद ठेवण्यात यावा असे आदेश असताना कणकवली आठवडा बाजार मंगळवारी सुरू होता.
दरम्यान या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नगर पंचायतीला रात्री उशिरा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश मिळाले. मात्र बाजारात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी नगर पंचायत कर्मचारी बाजारात कार्यरत असून पुढील आठवड्यापासून आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 9 =