डोळे ठेवा निरोगी
खा! आंबा, पपई, गाजर ,कोबी
पथनाट्यातून जनजागृती.
पिंपळे गुरव –
दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या प्रवेशद्वारा समोर ” डोळे ठेवा निरोगी खा! आंबा , पपई, गाजर, कोबी..”
हे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
पथनाट्यात सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप नन्नवरे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, सौ . संगीता जोगदंड, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे सहभागी झाले होते.
याप्रसंगी गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, पंकज पाटील, महंमद शरीफ मुलानी, बाळासाहेब साळुंके,संजय गमे, गजानन धाराशिवकर, पांडुरंग सुतार उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रदीप नन्नवरे म्हणाले..
” डोळे ही परमेश्वराने माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या आहारात “अ ” जीवनसत्त्व असणे गरजेचे आहे. “अ” जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे विकार बळावतात. आंबा, पपई, गाजर, कोबी यामध्ये “अ ” जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. आपल्या आहारात याचा समावेश सर्वांनी जरूर करावा. उद्यानाच्या परिसरात हे पथनाट्य घेण्याचे कारण म्हणजे अनेक माणसे सकाळी सकाळी व्यायामासाठी उद्यानात येत असतात. त्यांच्या कानावर डोळे निरोगी राहावेत म्हणून काय खावे याचे प्रबोधन या समाजसेवी संस्थांनी पथनाट्यातून केले आहे. पथनाट्य हे जनजागृतीचे उत्तम माध्यम आहे.”
आण्णा जोगदंड यावेळी म्हणाले.. “धकाधकीच्या जीवनात माणसांना सुलभ जीवनप्रणाली जगण्यासाठी मार्गदर्शन म्हणून दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्था पथनाट्य, प्रभात फेरी इति माध्यमातून काम करतात.
पिंपळे गुरव परिसरातील उदय ववले,हिरामण देवरे,आरोग्य विभागाचे निरीक्षक शंकर घाटे, रश्मी तुंडलवार , उमेश बोरसे, निलेश हंचाटे, आरोग्य मुकादम राहुल ओव्हाळ, पवन रंधे, आशा गायकवाड , राहुल जाधव, शुभम बेंद्रे, गणेश वाडेकर,पूजा जाधव,पूजा कोरी, सागर नागुलकर, सुनंदा तामचीकर, सुवर्णा कांबळे, विवेक जाविर,काशिनाथ जोशी, मोबिन पठाण, सागर पाटील,महेश सूर्यवंशी उपस्थित होते. राष्ट्रगीत म्हणून पथनाट्याची सांगता झाली.
वृत्तांकन
सुरेश कंक
75 22 90 27 27
