You are currently viewing विशाल परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गणेशाचे घेतले दर्शन

विशाल परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गणेशाचे घेतले दर्शन

कुडाळ :

 

सावंतवाडी व कुडाळ विधानसभा मतदारसंघात हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे युवा पदाधिकारी विशाल परब यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गणेशाचे दर्शन घेतले. मालवण तालुक्यातील घुमडे येथे अशोक सावंत, दुत्ता सामंत, मालवण शहरातील बाबा परब यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. तर वेंगुर्ला तालुक्यात भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष राजन गिरप, माजी नगरसेवक गावंढळकर, हिंद मराठा संघाचे उपाध्यक्ष विलास गावडे, रेडी येथील जि. प. माजी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, तात्या राणे, रामसिंग राणे, यांसह गावातील ग्रामस्थांच्या गणपतीचे दर्शन घेतले. तर मडूरा येथे सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

दोडामार्ग तालुक्यात नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मनोज पार्सेकर, वक्रतुंड कला क्रिडामित्र मंडळाचा सार्वजनिक गणपती, बांद्यात मकरंद तोरसकर, बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तर कुडाळातील वेताळ बांबर्डे येथील आनंद शिरवलकर, पणदूर सरपंच दादा साईल, देवेंद्र सामंत, तेर्सेबांबर्डे येथील रुपेश कानडे, सतीश माड्ये, अजय आकेरकर, अजय गावडे, नगरसेवक निलेश परब, पत्रकार अजय सावंत, कुंभारवाडी येथील बाळू कुंभार यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी अशोक सावंत, प्रशांत राणे, नगरसेवक निलेश परब, देवेंद्र सामंत, रुपेश कानडे, अजय आकेरकर आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − two =