आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांची भेट

आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांची भेट

पडवे लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजलाही दिली भेट

कणकवली

भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेतली.एस.एस.पी.एम मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल पडवे येथे ही भेट झाली.निसर्गरम्य ठिकाणावर उभारलेल्या भव्य हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या वस्तू आणि तेथिल आरोग्य सेवा पाहून आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार नारायण राणे यांच्या कर्तुत्वाला सलाम केला.ट्विटर वर सुद्धा आमदार पडळकर यांनी त्याबद्दल आपली पोस्ट केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज जिल्हात धनगर समाजाच्या मिटिंगा घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे,यांची भेट घेतली. यावेळी शिवदास बिडगर, माऊली हळणवर, सुभाष मस्के, नवलराज काळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा