स्वारगेट,पुणे -(१० मार्च) :
एस जी फिल्म प्रस्तुत व सूर पुराने आवाज नई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले समाजवादी विचारवंत शिक्षणतज्ञ कै. रामचंद्र जाधव यांच्या जन्मदिनानिमित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन सभागृहात डॉ अण्णा भाऊ साठे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड विठ्ठल सोनावणे यांना या वर्षीचा कृतज्ञता गौरव पुरस्कार २०२६ या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य (अध्यक्ष-अखिल भारतीय आरोग्य सेना) यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल,पुष्पहार सन्मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते याप्रसंगी राहुल जाधव, शरद जावडेकर, (अध्यक्ष- अ भा स शिक्षण हक्क सभा) श्रीमती जाधव, सौ शारदा.जाधव नितीन पवार (अध्यक्ष रिक्षा संघटना पुणे) पत्रकार निवेदक गायक रानकवी जगदीप वनशिव, जनाबापू पुणेकर, जगन्नाथ कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते, अनेक क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते
प्रथम सत्र बाप काव्यमैफिलीचे अध्यक्ष बोल्डकवी गझलकार म भा चव्हाण प्रमुख पाहुणे संतकवी वि ग सातपुते गझल कार अरुण कटारे प्रा प्रतिमा काळे डॉ मदन देगावकर किशोर टिळेकर प्रा सुर्यकांत नामगुडे अनिल नाटेकर आत्माराम हारे सूत्रसंचालन कविता काळे यांनी केले
दुसऱ्या सत्रामध्ये गीत मैफिलीत जुन्या नन्या मराठी हिंदी चित्रपटातील गीते सादर करून एस जी फिल्म प्रोडक्शन चा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
