You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायतीकडून मुलांसाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ विषयावर कार्यशाळा संपन्न…

न्हावेली ग्रामपंचायतीकडून मुलांसाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ विषयावर कार्यशाळा संपन्न…

न्हावेली ग्रामपंचायतीकडून मुलांसाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ विषयावर कार्यशाळा संपन्न…

ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद;अष्टविनायक धाऊसकर यांचा पुढाकार…

​सावंतवाडी

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यावर आळा घालण्यासाठी आणि मुलांच्या भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी न्हावेली ग्रामपंचायतीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ज्ञानू सिंधू टेक्निकल अँड स्क्रीन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आणि न्हावेली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील मुलांसाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. न्हावेलीचे सरपंच अष्टविनायक सुधाकर धाऊसकर यांनी पुढाकार घेऊन गावातील मुलांच्या हितासाठी या मार्गदर्शनाचे नियोजन केले होते.
​या कार्यशाळेला गावातील चारही शाळांमधील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर, डोळ्यांवर आणि विशेषतः त्यांच्या मानसिक विकासावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पालकांनी ग्रामपंचायतीच्या या नियोजनाचे भरभरून कौतुक केले. न्हावेली ग्रामपंचायत केवळ पायाभूत सुविधांवर भर न देता मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी वेळोवेळी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच आणि सर्व सदस्यांचे आभार मानले.​या विशेष कार्यक्रमाला सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांच्यासह उपसरपंच अक्षय पारसेकर ग्रामविकास अधिकारी राजेश परब, ग्रामपंचायत सदस्य संतोष नाईक, सागर धाऊसकर, सागर जाधव, आरती माळकर, निकिता परब, सानिका हळदणकर, राजश्री कालवणकर, स्नेहा पारसेकर आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये मोबाईल वापराबाबत मोठी जनजागृती झाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा