You are currently viewing वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी सिद्धेश उर्फ बंटी रावराणे; उपसभापतीपदी साची सचिन कोलते बिनविरोध
Oplus_16908288

वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी सिद्धेश उर्फ बंटी रावराणे; उपसभापतीपदी साची सचिन कोलते बिनविरोध

दोन्ही पदांवर भाजपाचा विजय; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

 

वैभववाडी :

वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सिद्धेश उर्फ बंटी रावराणे तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. साची सचिन कोलते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड जाहीर होताच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळात वैभववाडी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा