You are currently viewing डॉ. रमाकांत गावडे यांना ‘सामाजिक विकासात्मक कार्य’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

डॉ. रमाकांत गावडे यांना ‘सामाजिक विकासात्मक कार्य’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

बबन साळगावकर व नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते गौरव

बांदा :

बांदा येथील गोगटे-वाळके कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. रमाकांत गावडे यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राजे प्रतिष्ठान, सातारा यांच्या वतीने दिला जाणारा “सामाजिक विकासात्मक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे बांदा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बबन साळगावकर आणि नगरसेवक आडिवरेकर यांच्या हस्ते डॉ. रमाकांत गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर उपस्थित होते.

डॉ. गावडे यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राजे प्रतिष्ठान, सातारा यांनी त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.

या पुरस्कारामुळे गोगटे-वाळके कॉलेज तसेच बांदा परिसराचा गौरव वाढला आहे. डॉ. गावडे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. गावडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याची दखल असून भविष्यातही ते समाजहितासाठी कार्यरत राहतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा