You are currently viewing मनसेमुळेच चिपी विमानतळ जोडरसत्यास ७.५० कोटी मंजुर

मनसेमुळेच चिपी विमानतळ जोडरसत्यास ७.५० कोटी मंजुर

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सातत्याने उठवला होता आवाज

चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ जोडणारे रस्ते दुरुस्तीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता देत ७.५० कोटीचा निधी मंजुर केला आहे.मनसे सातत्याने आवाज उठवत असलेल्यानेच सत्ताधारी कामाला लागले असल्याची प्रतिक्रिया मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

जुन महिन्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत चिपी विमानतळ परिसराची पाहणी केली होती.विमानतळ कामासंदर्भातील त्रुटी तसेच जोड-रस्त्यांच्या कामाबाबत सर्वप्रथम आवाज उठवला होता.यानंतरही सातत्याने सत्ताधार्‍यांना पायाभुत सुविधा नसल्याबाबत लक्ष वेधले होते.विमानतळ व विमानतळासाठी आवश्यक जोडरस्ते नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरात कागदी विमाने उडवून सत्ताधार्‍यांचा निषेध केला होता.म्हणूनच कुडाळ पिंगुळी म्हापण कोचरे श्रीरामवाडी कोचरेबंदर रस्ता (राज्यमार्ग १८३) ०/०० ते १३/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरणासाठी ४ कोटी ५७ लाख तसेच मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगेरस्ता (राज्यमार्ग १७९)किमी ०/०० ते ११/८५० मध्ये सुधारणा व डांबरीकरणासाठी २ कोटी ९२ लाख या रस्त्यांच्या कामांना आरएमआर -२०२१/प्र.क्र१२८/रस्ते-१ दि.२७.०९.२०२१ यापत्राद्वारे शासनाने मंजुरी दिली आहे.

लवकरच या रस्त्यांच्या निविदा प्रकिया पार पाडून कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.कामे योग्य मोजमापे व दर्जेदार होण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते लक्ष ठेवतील.पण नेहमी प्रमाणे जर सत्ताधाऱ्यांनी फसवले तर मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असल्याचेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा