You are currently viewing राष्ट्रवादी नेते आबिद नाईक यांच्या निवास्थानी कोकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटीलांची भेट

राष्ट्रवादी नेते आबिद नाईक यांच्या निवास्थानी कोकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटीलांची भेट

कणकवली :

 

विधान परिषदचे कोकण शिक्षक मतदार संघाचे आम. बाळाराम पाटिल यांनी आज राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी पाटील यांनी श्री. नाईक यांची कन्या इक्रा हिला १० वीत ९५% गुण मिळाल्याबद्दल त्यांनी तिचे कौतुक केले. तर श्री.नाईक यांनी शाल-फळ व पुष्पगुच्छ देऊन श्री.पाटील यांचा सन्मान केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अभिनंदन मालंडकर, राष्ट्रवादी कणकवली माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर सरचिटणीस अनीस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत सरवदे सर, शिक्षक अच्युतराव वनवे सर, शिक्षक राजेश शिगनाथ उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांच्या काही समस्या बाबतीत शिक्षक अच्युतराव वनवे यांनी श्री.पाटील यांच्याशी चर्चा केली.त्या समस्या लवकरात लवकर शासन स्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री.पाटील यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा