You are currently viewing जामसंडे-आझाद नगर टापू परिसरात आग, आंबा बागेचे नुकसान…

जामसंडे-आझाद नगर टापू परिसरात आग, आंबा बागेचे नुकसान…

जामसंडे-आझाद नगर टापू परिसरात आग, आंबा बागेचे नुकसान…

देवगड

जामसंडे बाजारपेठ येथील आझाद नगर टापू परिसरात आग लागल्यामुळे परिसरातील आंबा कलमे व गवताचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी १२ वाजता घडली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन बंब घेऊन नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आझाद नगर येथील आंबा कलम बागेत आग लागल्याची माहिती नगरसेवक तेजस मामघडी यांनी नगरपंचायतीमध्ये कळवतात अग्निशमनबंबासह नगरपंचायतीचे कर्मचारी मकरंद घाडी, नील बांदिवडेकर, कुंदन घाडी, किशोर सावंत यांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतानाच माजी नगरसेवक नीरज घाडी, रवींद्र ठुकरुल, चंदन मामघाड़ी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आंबा कलमांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − six =