You are currently viewing सावंतवाडी प्रेरणाभुमी मार्फत लवकरच संकल्प परिषदेचे आयोजन…

सावंतवाडी प्रेरणाभुमी मार्फत लवकरच संकल्प परिषदेचे आयोजन…

सावंतवाडी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ च्या भेटीचे प्रेरणा भूमीत रूपांतर करण्यासाठी नुकत्याच स्थापन झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणा भूमी संवर्धन समिती सिंधुदुर्गच्या रविवारी पार पाडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत लवकरच संकल्प परिषद घेण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
प्रेरणा भूमी संवर्धन समितीची बैठक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात समितीचे अध्यक्ष डी. के. पडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर समितीचे कार्याध्यक्ष अंकुश कदम, सहसचिव पत्रकार मोहन जाधव, सौ. प्रियदर्शनी जाधव इ. उपस्थित होते.
प्रारंभी मोहन जाधव यांनी स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त वाचून जमा खर्च सादर केला. यावर
साधक बाधक चर्चा पार पडल्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी धर्मदाय संस्थेची परवानगी घेणे विद्यमान समितीचा विस्तार करून त्याला स्थायी रूप देण्याच्या धोरणावर चर्चा करण्यात आली.
संस्थेचा कृती कार्यक्रमाच्या नियोजनानुसार महिला समिती, आरोग्य समिती, सामाजिक अन्याय अत्याचार निवारण समिती, सांस्कृतिक समिती इ. समित्यांच्या निवड करण्यात आल्या.
वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करून या कार्यक्रमाची सुरुवात पुढील महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या ठिकाणी जाहीर सभा झाली त्याच ठिकाणी संकल्प परिषद घेण्याचा ठरावही संमत करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आरवली टांक हायस्कूलचे शिक्षक तथा माजगावचे सुपुत्र मोहन लाडू जाधव यांनी रोख ५ हजारांची देणगी ही जाहीर केली. आजच्या चर्चेत नारायण आरोंदेकर, मोहन जाधव, क्रांतिराज सम्राट, भावना कदम, रश्मी पडेलकर, प्रियदर्शनी जाधव, प्रभाकर जाधव, ममता जाधव, अशोक कदम, वासुदेव जाधव इ. चर्चेत भाग घेतला.
कार्याध्यक्ष अंकुश कदम यांनी पुढील वर्षभरासाठी कृती कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले तर श्री पदेलकर यांनी आर्थिक नियोजन व जनसंपर्क यावर मार्गदर्शन करून प्रत्येक व्यक्तीनिहाय संपर्क संपर्क करण्याचे आव्हाहन केले. शेवटी मोहन जाधव यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा