You are currently viewing प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या सारख्या सच्चा मित्राला मुकलो

प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या सारख्या सच्चा मित्राला मुकलो

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भावपूर्ण श्रद्धांजली

सावंतवाडी

प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या सारख्या सच्चा मित्राला मुकलो असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली.

सुरेश प्रभू यांनी पाठविलेल्या शोक संदेशात म्हटले आहे,आमचे जेष्ठ मिञ आणि मार्गदर्शक प्रा. महेंद्र नाटेकर यांच्या दु;खद निधनाची बातमी समजली. गेली कित्येक वर्षे मी व्यक्तीशः नाटेकर आणि त्यांच्या कुटुंबियांशी जोडला गेलो. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झालेली असून मी व्यक्तीशः माझ्या एका सच्चा मिञाला मुकलो. निवृत्तीधारकांचे ते आधारवड होते. हे दु:ख पचविण्याचे सामर्थ्य त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वराने देवो. त्यानां भावपूर्ण आदरांजली.

प्रतिक्रिया व्यक्त करा