You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळमध्ये “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रम; विविध स्पर्धा, सन्मान सोहळा व भव्य लकी ड्रॉचे आयोजन
Oplus_16908288

जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळमध्ये “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रम; विविध स्पर्धा, सन्मान सोहळा व भव्य लकी ड्रॉचे आयोजन

सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री सिंधुदुर्ग राजा मैदान येथे कार्यक्रम

 

कुडाळ :

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने “जागर स्त्री शक्तीचा” हा विशेष कार्यक्रम सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कुडाळ पोस्ट ऑफिसजवळील श्री सिंधुदुर्गन राजा मैदान, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची माहिती शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला नगरसेविका चांदणी कांबळी, शहर अध्यक्ष श्रुती वर्दम, नयना मांजरेकर, शिवसेना तालुका सचिव रेवती राणे, तालुकाप्रमुख युवती दिपाली कानसे, उप तालुकाप्रमुख जान्हवी कदम, जिल्हा सचिव दादा साईल, शहर अध्यक्ष अभी गावडे, उप शहर प्रमुख चेतन पडते आदी उपस्थित होते.

माजी आमदार निलेश नारायण राणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार निलेश नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच महिलांसाठी अनेक मनोरंजक व स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महिला ढोल-ताशा पथक, पाककला स्पर्धा (खाद्य पदार्थ नाचणी), उखाणा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, तसेच निमंत्रित ग्रुप डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाककला स्पर्धेसाठी स्पर्धकांनी तयार केलेली कृती सोबत आणणे आवश्यक आहे.

तसेच कार्यक्रमात “खेळ पैठणीचा” हा आकर्षक उपक्रम ठेवण्यात आला असून प्रथम क्रमांकासाठी पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ, तर तृतीय क्रमांकासाठी चांदीचा करंडा अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू, भव्य लकी ड्रॉ, खाऊगल्लीत स्ट्रीट फूड, तसेच शॉपिंग स्टॉल्स यांचेही आयोजन करण्यात आले आहे. लकी ड्रॉमध्ये मिक्सर, पंखा, इलेक्ट्रिक केटली, कढई, फ्रायपॅन यांसारख्या आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

पाककला स्पर्धेसाठी संपर्क : सौ. रेवती राणे – ९४२२३७९६१२, सौ. रेखा काणेकर – ९७६५२३११४३

उखाणा स्पर्धेसाठी संपर्क : कु. चांदणी कांबळी – ९९२१०५६४१९, सौ. श्रुती वर्दम – ९४२११४५०४१

या कार्यक्रमाचे नियोजन सौ. दिपलक्ष्मी पडते, सदस्य – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तथा जिल्हाप्रमुख – शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा