You are currently viewing तलाठी सजा पुनर्रचनेतील हरकतींकडे आ. वैभव नाईक यांनी वेधले महसूल मंत्र्यांचे लक्ष

तलाठी सजा पुनर्रचनेतील हरकतींकडे आ. वैभव नाईक यांनी वेधले महसूल मंत्र्यांचे लक्ष

*६ गावांची मूळ तलाठी सजांमध्ये फेररचना करण्याची केली मागणी*

*कोकण विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे ना.बाळासाहेब थोरात यांचे आदेश*

कुडाळ व मालवण तालुक्यातील पुनर्रचना केलेल्या तलाठी सजांमध्ये काही गाव चुकीच्या तलाठी सजांना जोडले गेले आहेत.कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात लोकांना याचा त्रास होणार आहे. या पुनर्रचनेबाबत महसूली गावांनी हरकती नोंदविल्या आहेत.त्यानुसार तलाठी सजांमध्ये फेररचना करण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन केली आहे. त्याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले आहे.

यामध्ये कुडाळ तालुक्यातील पाट गांधीनगर मूळ तलाठी सजा पाट मध्ये समाविष्ट करणे, देऊळवाडी गाव मूळ तलाठी सजा पिंगुळी मध्ये समाविष्ट करणे, पावशी मिटक्याचीवाडी मूळ तलाठी सजा पावशी मध्ये समाविष्ट करणे, निवजे गाव मूळ तलाठी सजा गोठोस मध्ये समाविष्ट करणे, भडगाव खुर्द मूळ तलाठी सजा कडावल मध्ये समाविष्ट करणे, मालवण तालुक्यातील किर्लोस आमवणे गाव मूळ तलाठी सजा किर्लोस मध्ये समाविष्ट करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यावर महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव तपासून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा