You are currently viewing अभिज्ञा हॉटेल उत्पनापैकी ५० टक्के रक्कम स्वराज्य निधी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ला सुपूर्द…

अभिज्ञा हॉटेल उत्पनापैकी ५० टक्के रक्कम स्वराज्य निधी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ला सुपूर्द…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दिनांक 15 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान अभिज्ञा हॉटेलला मिळणाऱ्या उत्पनापैकी ५० टक्के रक्कम 25755/- रुपये स्वराज्य निधी म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग याच्याकडे देण्यात आली. यावेळी हॉटेलचे मालक मा.श्री.अमित चंद्रकांत राऊळ, त्यांचे वडील मा.श्री.चंद्रकांत राऊळ तसेच संजय शिवाजी सुभेदार आणि राऊळ कुटुंबीयातर्फे चेक स्वरूपात देण्यात आली.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाला रविवारी दिनांक २१/०२/२०२१रोजी दुपारी १२:००वाजता सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाचे खजिनदार विवेक गावडे आणि संघटक सुनील राऊळ, संघटक सूरज सावंत, रितेश राऊळ, प्रणव माईनकर तसेच उपस्थित सर्व दुर्ग सेवकाच्या अध्यक्षतेखाली रुपये 25755/- चा चेक सुपूर्द करण्यात  आला.
नवीन उपक्रमांच्या सुरुवातीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देवुन  ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या हाॅटेलच्या उत्पन्नातून ५०टक्के रक्कम ही सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाला देण्याचे ठरवले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग हाॅटेल अभिज्ञा मालक श्री अमित चंद्रकांत राऊळ यांचे  आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − six =