You are currently viewing कळसुली येथे ओहोळात पुरुषाचा मृतदेह आढळला

कळसुली येथे ओहोळात पुरुषाचा मृतदेह आढळला

कणकवली : कळसुली येथे ओहोळात पुरुषाचा मृतदेह आढळला

मृताची ओळख शंकर अनंत कुडतरकर (वय ४८); मृत्यूचे कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

कणकवली

तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर (वय ४८) अशी पटली आहे. मृतदेह पुरुष जातीचा असून अंगात फुल हाताचा शर्ट व ट्रॅक पॅण्ट परिधान केलेली असल्याचे दिसून आले.
शंकर कुडतरकर हे बांधकाम व्यवसायात मजुरीचे काम करत होते. कामानिमित्त ते विविध ठिकाणी जात असत व काही काळ तेथेच वास्तव्यास राहत असत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार ते घरात स्वतंत्र राहत होते. त्यांच्या पश्चात वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. पत्नी व मुलगा सध्या त्यांच्यासोबत राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही केली असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. पंचनामा पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा