You are currently viewing शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचे आंदोलन स्थगित

शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांचे आंदोलन स्थगित

आजपासून सुरू होणार दोडामार्ग – वझरे – विर्डी बसफेरी

दोडामार्ग

वझरे येथे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने गेले कित्येक दिवस दोडामार्ग – वझरे – विर्डी ही एस.टी. बसफेरी बंद होती, दरम्यान आता या पुलाचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीस योग्य आहे त्यामुळे ही बसफेरी नियमित सुरू व्हावी अशी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी होती मात्र रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याचे कारण देत एस टी प्रशासनान ही बसफेरी सुरू करण्यास टाळाटाळ करत होता त्यामुळे येथील लोकांचे बाजार रहाट तसेच दवाखाना व इतर कामासाठी दोडामार्ग गाठताना वाहतुकीचा इतर पर्याय नसल्याने अनेक समस्याना सामोरे जावे लागत होते. यासाठी शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी एस टी विभागाला निर्वाणीचा इशारा देत सदर बसफेरी सुरू न केल्यास २६ ऑगस्ट पासून एक ही एस.टी. बस दोडामार्ग स्थानकातून सोडू देणार नसल्याचे म्हटले होते अखेर काल २५ ऑगस्ट रोजी एस टी प्रशासनाचे अधिकारी व बाबुराव धुरी आणि ग्रामस्थांनी या रस्त्याची पाहणी करत रस्ता प्रवासास योग्य असल्याची खात्री केल्यानन्तर ही एस टी बसफेरी आज २६ ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याने आपले आंदोलन मागे घेत असल्याचे बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

ही एस टी बस फेरी ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर सुरू होत असल्याने ग्रामस्थांत समाधान असून ग्रामस्थांनी बाबुराव धुरी यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा