🏏 धवडकी येथे भव्य ‘RC चषक 2026’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
केसरी धनगर समाजाच्या वतीने 7 व 8 मार्च रोजी मर्यादित षटकांची स्पर्धा; 35 हजारांचे प्रथम पारितोषिक
सावंतवाडी
धवडकी चिले मैदान येथे केसरी धनगर समाजाच्या वतीने शनिवार व रविवार, दिनांक 7 व 8 मार्च रोजी “एक गाव एक संघ” मर्यादित षटकांची भव्य RC चषक 2026 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मा. रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या आशीर्वादाने पार पडणार आहे.
या स्पर्धेत सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ या चार तालुक्यांतील एकूण 16 संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 35,000 तर द्वितीय पारितोषिक रुपये 21,000 आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.
तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अंतिम सामनावीर यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जनार्दन लांबर, संतोष वरक, विजय जंगले, प्रकाश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, विलास जंगले (मो. 9764045401) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केसरी उपसरपंच संदीप पाटील यांनी केले आहे.
शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
