You are currently viewing कुडाळ येथे संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ येथे संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ येथे संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ :

श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या शिबिराचे उद्घाटन मान. श्री. शांताराम भाऊ कदम, अध्यक्ष, कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळ यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मान. श्री. दिलीप भालेकर (जिल्हाध्यक्ष, परीट समाज सिंधुदुर्ग), मान. श्री. नंदकुमार राक्षे (खजिनदार, कोकण प्रदेश परिट सेवा मंडळ), मान. सौ. दिपाली भालेकर (महिला जिल्हाध्यक्ष, परीट समाज सिंधुदुर्ग) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास व्यासपीठावर मान. श्री. दीपक नारकर (जि. प. सदस्य), मान. श्री. दीपक चव्हाण (पं. स. सदस्य), मा. श्री. संजय गायकवाड, मा. श्री. किशोर वासकर, श्री. राजेंद्र भालेकर, श्री. मोहन वालकर, श्री. शेखर कडू, श्री. भालचंद्र करंजेकर, श्री. विजय पाटील, श्री. महेंद्र आरोलकर, श्री. सदानंद अणावकर, श्री. प्रसाद पाटकर, सौ. सविता मडवळ, सौ. मंजुना आरोलकर, सौ. मनाली चव्हाण, सौ. अक्षता कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच जि. प. सदस्यपदी मान. श्री. दीपक नारकर, पं. स. सदस्यपदी मान. श्री. बंद्र चव्हाण आणि नगरसेवक तथा महिला व बालकल्याण सभापतीपदी मान. सौ. दिपाली भालेकर यांची निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. मान. श्री. शांताराम भाऊ कदम, मान. श्री. नंदकुमार राक्षे व मान. श्री. दिलीप भालेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सदानंद अणावकर, श्री. तात्या कुडाळकर, श्री. विजय आजगावकर, श्री. प्रदीप नारकर, श्री. अनिल शिवडावकर, श्री. बबन कवठकर, श्री. मुकेश नारकर, सौ. माया कुडाळकर, सौ. एकता कुडाळकर, सौ. साक्षी कुडाळकर, सौ. वैदेही म्हापणकर, सौ. स्वराली कवठकर, सौ. गीतांजली आजगावकर आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मान. श्री. प्रदीप नारकर यांनी केले.

_________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*Admission Open…..Admission Open*

*🎓 G.N.M. नर्सिंग प्रवेश 2026–27 सुरू 🎓*

*यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.*

*✅ 12 वी परीक्षापूर्वी GNM अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी*

*✅ 3 वर्षांचा G.N.M. नर्सिंग अभ्यासक्रम*

*✅ इंडियन नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त*

*✅ शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध*

*✅ अनुभवी प्राध्यापक वर्ग व उत्तम शैक्षणिक वातावरण*

*✅ आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंग व प्रॅक्टिकल एक्सपोजर*

*✅ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत पगाराची नोकरी मिळवण्याची संधी*

*✅ 100% प्लेसमेंट असिस्टन्स*

*📍 पत्ता: मिरजोळे रोड, MIDC, एअरपोर्ट जवळ, रत्नागिरी*

*📞 संपर्क: 8600302454 / 9423291863 / 8830789570*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/195145/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा