You are currently viewing मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर,सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर,सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई येथे ना. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश

भाजपचे मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, व देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर यांनी आज मुंबई येथे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. ना. आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री ना.उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, हेमंत डिचोलकर, भूषण परुळेकर, रीमेश चव्हाण आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =