कोरोनाचे नियम पाळुन सहभागी होण्याचे जिल्हा कुस्ती संघटनेचे आवाहन
तळेरे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या परिपत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या निवड चाचणी स्पर्धा शनिवार दि. 27/02/2021 रोजी कासार्डे हायस्कूलच्या सभागृहात कोरोना साथीच्या पार्श्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन घेतली जाणार आहे. याठिकाणी प्रोढगट पुरूष- (वरिष्ठ गट) व वरिष्ठ महिला गट निवडचाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत मर्यादीत खेळाडू संख्या अपेक्षित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्या 30 कुस्तीगीरानी संधी देण्यात येणार आहे वरिष्ठ गट पुरुष:- वजन गट- 57kg. 61kg..65kg.70kg 74kg 79kg 86kg 92kg 97kg व 86 ते 125 kg या गटात होणार आहेत या स्पर्धेत सहभागी कुस्तीगीर हा या जिल्ह्याचा पाच वर्षे रहिवासी व 18 वर्षे पूर्ण झालेला असावा *महिला विभाग वजन गट-:*
50kg 53kg 55kg 57kg 59kg 62kg 65kg 68kg 72kg 76kg पर्यंत या गटात सहभागी.होणारी कुस्तीगीर ही या जिल्ह्य़ातील पाच वर्षे रहिवासी असणे आवश्यक आहे नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा सचिव.श्री.दाजी रेडकर पाट मोबा.9404920009 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेने केले असून दि. 25/02/2021 सांय.5 पर्यंत अंतिंम नोंदणी होईल याची नोंद जिल्ह्यातील मल्लांनी घ्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे.