You are currently viewing डोंगरपाल शाळेत अवतरले बालशिवाजी

डोंगरपाल शाळेत अवतरले बालशिवाजी

बांदा
महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद डोंगरपाल शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी कार्यक्रमाची सुरवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री निवृत्ती गवस यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या दिवशी वेशभूषा, भाषण, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साई केळुसकर व समर्थ गावडे याने शिवाजी महाराज तर नित्या गवस व भार्गवी गवस यांनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा सादर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाला गुरुदास केळूसकर, निवृत्ती गवस, रेशम गावडे, गायत्री केळुसकर, निर्मिती गवस यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक श्री रमेश पवार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा