महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी भक्ती गावडे कालवा निरीक्षक पदावर निवड
सावंतवाडी
महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी भक्ती राजन गावडे हिने जलसंपदा विभागांतर्गत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत यश संपादन करत कालवा निरीक्षक (Canal Inspector) पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महेंद्रा अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भक्तीने सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले. तिच्या यशाबद्दल अकॅडमीच्या संचालकांसह शिक्षकवर्गाने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
