You are currently viewing श्री देव रामेश्वर मंदिर भिरवंडे अखंड हरिनाम सप्ताह  २६ फेब्रुवारी पर्यंत साजरा होणार….

श्री देव रामेश्वर मंदिर भिरवंडे अखंड हरिनाम सप्ताह  २६ फेब्रुवारी पर्यंत साजरा होणार….

कणकवली

श्री देव रामेश्वर मंदिर भिरवंडे माघ शुद्ध रथसप्तमी वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह १९ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत श्री देव रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे साजरा होत आहे. यावर्षी कोरोना व्हायरस साथरोग नियंत्रणासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन करुन अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माघ शुद्ध रथसप्तमी अर्थात १९ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता घटस्थापना झाली. नंतर अखंड हरिनामाचा जागर श्री देव रामेश्वर मंदिरात होतं आहे. यासाठी मंदिराची रंगरंगोटी विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स आणि खाऊची दुकाने, प्रसादाची दुकाने सजली आहेत. भिरवंडे गावामध्ये एक चैतन्याचे वातावरण असून श्री देव रामेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहला शेकडोंनी भाविक चाकरमानी भक्त गावांमध्ये दाखल होऊ लागली आहेत. यंदा २० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी १ ते ३ या वेळेतच महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. याच बरोबर रात्री बारा वाजता नियमितपणे श्री देव रामेश्वर पालखी मिरवणूक वाजत-गाजत निघणार आहे, तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा