You are currently viewing नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धेत खुल्या गटात नागसेन सपकाळे प्रथम

नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धेत खुल्या गटात नागसेन सपकाळे प्रथम

गेली ​४२ वर्षे सुरू आहे ही एकांकिका स्पर्धा

कणकवली:

​कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची गेली ​४२ वर्ष अखंडपणे चालू असलेली सुपरिचित नाथ पै एकांकिका स्पर्धा डिसेंबर २०२० मध्ये करोनाच्या संकटामुळे होऊ शकली नाही मात्र सांस्कृतिक वाटचालीत मैलाचा दगड ठरलेला हा उपक्रम प्रतिष्ठानने खंडित होऊ न देता नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा २०२० जाहीर केली होती त्याला​ ​नाट्य लेखकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला​. ​शालेय व खुल्या या दोन गटात घेतलेल्या स्पर्धेतील शालेय गटाचा निकाल प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. आता प्रतिष्ठानने खुल्या गटाचा निकाल जाहीर केला असून तो पुढील प्रमाणे –

प्रथम क्रमांक एकांकिका​-​ बोझ
लेखक – नागसेन सपकाळे
द्वितीय क्रमांक एकांकिका – प्रयोजन लेखिका – सुनेत्रा मराठे
तृतीय क्रमांक एकांकिका – लॉक -अन – लॉक​;​ लेखक – अनील कोष्टी आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ​३ एकांकिकांना दिले असून ते पुढील प्रमाणे

१)एकांकिका – जाळ लेखक- अमेय जाधव
२) एकांकिका घात- अपघात लेखिका- उषा परब
३) एकांकिका – सरपण लेखक – संतोष वरधावे
खुल्या गटात ४६ पुरुष व १४ महिला अशा एकूण ६० लेखक- लेखिकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे परीक्षण नाटककार मा. अजित दळवी; नेपथ्य व प्रकाशयोजनाकार​ ​ प्रदीप मुळये आणि दिग्दर्शक ​ ​ गिरीश पतके यांनी करून एकमताने निर्णय दिला आहे. स्पर्धेचे परीक्षक व सर्व स्पर्धकांना प्रतिष्ठानने धन्यवाद दिले असून शालेय व खुल्या गटातील विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण होणार असून याबाबतच्या तारखा लवकरच प्रतिष्ठान जाहीर करणार आहे असे संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.एन.आर देसाई , कार्यवाह शरद सावंत व स्पर्धा प्रमुख प्रा. अनिल फराकटे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + eighteen =