दोडामार्ग तालुक्यात महायुतीचा झंझावात
सर्व उमेदवार विजयी
भाजपा व शिंदे सेना प्रत्येकी तीन पंचायत समिती
जिल्हा परिषद दोन भाजपा तर एक शिंदे सेना विजयी
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात जि.प. व पं.स. निकाल जाहीर झाला असून भाजपा शिंदे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहे . यात कोलझर पं.स. शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवडून झाली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक निकाल ऐकण्यासाठी आणि तालुक्याच्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी मोठी गर्दी उसळली. काहींनी पक्षाशी बंडखोरी करत निवडणुकीला सामोरे गेले त्यांना धूळ चारली आहे उबाठा सेना जिल्हा प्रमुख बाबुराब धुरी यांना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रीती धुरी मणेरी मधून पराभूत झाल्या आहेत. त्यांना नवख्या उमेदवार सोनिया कुबल यांनी पराभूत केले आहे
जिल्हा परिषद
मणेरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) यात सुनिता कमलाकर भिसे (अपक्ष), ललिता लक्ष्मण ताटे (ठाकरे शिवसेना), साक्षी विशांत तळवडेकर (शिंदे शिवसेना) ३४५५मते यांच्या तिहेरी लढत झाली होती. यात शिंदे शिवसेनेच्या साक्षी तळवणेकर विजयी झाल्या आहेत.
साटेली भेडशी (सर्वसाधारण महिला) या गटातून सुनंदा सुधाकर धर्णे (ठाकरे शिवसेना) व श्वेता सूर्यकांत धर्णे (भाजपा) यांच्या दुहेरी लढत झाली. यात श्वेता सूर्यकांत धर्णे विजयी झाल्या आहेत
माटणे (सर्वसाधारण) या गटातून बाबुराव दत्ताराम धुरी (ठाकरे शिवसेना), लक्ष्मण दशरथ गवस (अपक्ष), प्रकाश लक्ष्मण कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)), रामा दशरथ गवस (भाजपा) व राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (अपक्ष) यांच्यात लढत झाली. यात भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस १७०० मतांनी विजयी झाले आहेत.
पंचायत समिती
मणेरी (सर्वसाधारण) या गणातून दीपक बुधाजी जाधव (बहुजन समाज पार्टी), प्रीती बाबुराव धुरी (ठाकरे शिवसेना), संजय तुकाराम देसाई (अपक्ष), प्रवीण पांडुरंग गवस (अपक्ष), अनिरुद्ध अविनाश फाटक (अपक्ष) व सोनिया विश्राम कुबल -भाजपा यांच्यात लढत झाली. यात सोनिया कुबल (भाजपा) विजयी झाले आहे
कोनाळ (सर्वसाधारण महिला) सोनाली सुनील गवस (ठाकरे शिवसेना), साक्षी संदीप देसाई (अपक्ष) व सायली स्वप्नील निंबाळकर (शिंदे शिवसेना) यांच्यात तिहेरी लढत झाली. यात शिंदे शिवसेनेच्या सायली निंबाळकर विजयी झाल्यात
साटेली भेडशी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या गणातून गंगाराम जानू कोळेकर (अपक्ष), सिद्धेश गुरुनाथ कासार (ठाकरे शिवसेना), संदीप मोगरा नाईक (राष्ट्रीय काँग्रेस) व संजय पांडुरंग सातार्डेकर (भाजपा) यांच्यात लढत झाली. यात भाजपचे संजय सातार्डेकर विजयी झालेत.
झरेबांबर पंचायत समिती
नेहा गवस शिंदे (शिवसेना)
विनिता विष्णू घाडी (ठाकरे शिवसेना) व वृषाली प्रकाश गवस (अपक्ष) यांच्यात तिहेरी लढत झाली. यात शिवसेनेच्या नेहा गवस विजयी झाल्या आहेत.
माटणे (सर्वसाधारण महिला) या गणातून प्रिया तुषार नाईक (ठाकरे शिवसेना), पार्वती महादेव गवस (भाजपा), सुप्रिया शैलेश नाईक (अपक्ष) यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. यात पार्वती गवस ह्या विजयी झाल्यात.
कोलझर (सर्वसाधारण) या गणातून युतीचे उमेदवार तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली.
दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद मणेरी मतदार संघ मोजणी सुरू, टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण
