सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया समाप्त
माजी आमदार वैभव नाईक यांची बुथना भेट
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडले आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाबाबत चांगला उत्साह दिसून आला. विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध गावांमधील शिवसेना पक्षाच्या बुथना भेटी दिल्या. त्यांनी प्रत्येक बुथवर जाऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच बुथप्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही वैभव नाईक यांनी केले. त्यांच्या या बुथ भेटीदरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक वातावरणात राजकीय हालचालींना वेग आला असून मतदानाच्या टक्केवारीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
